सिन्नर प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक 31-1-2025 रोजी पाथरे येथे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेले श्री महालक्ष्मी देवस्थान या मंदिराचा जीर्णोद्धार सिन्नर तालुक्याचे कार्यसम्राट नामदार माणिकर कोकाटे यांच्या सण 2023- 2024 आमदार स्थानिक विकास निधी मधून 25 लाख रुपये खर्च करून भव्य असे श्री महालक्ष्मी देवस्थान मंदिर व सभा मंडप उभे केले.. या महालक्ष्मी मंदिराच्या लोकार्पण सोहळ्या दरम्यान शिर्डी येथील 1008 महामंडलेश्वर स्वामी काशीकानंद महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद नाशिक माजी सदस्य सीमांतिनी माणिकराव कोकाटे या उपस्थित होत्या . या सोहळ्यामध्ये स्वामी काशीकानंद महाराज यांनी खूप छान प्रकारे कीर्तन रुपी सेवा दिली. व तसेच जिल्हा परिषद नाशिक माजी सदस्य सीमंतिनी माणिकराव कोकाटे यांनी ग्रामस्थांमध्ये खाली बसून कीर्तनाचा आनंद घेतला. या कार्यक्रमासाठी पाथरे गावातील गावकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद होता. या सोहळ्या दरम्यान पाथरे येथील पुरोहित हर्षल पाटील ,गावचे प्रथम नागरिक स्वाती नरोडे ,उपसरपंच मनिषा ताई बिडवे ,वारेगावचे सरपंच रेश्माताई चिने पाथरे खु.सरपंच किसनराव माळी यांच्यासह माजी सरपंच मच्छिंद्र चिने, भाऊसाहेब पाटील नरोडे ,संपत चिने मीनाथ माळी, चंद्रकांत चिने, अमोल दवंगे ,बाळासाहेब खळतकर, अशोकराव नरोडे, सदाशिव माळी, सोनू बाबा माळी, राजेंद्र बिडवे, संतोष ढवण ,प्रकाश दवंगे, पुष्पाताई जाधव, संतोष रामनाथ माळी, सुनील चिने, इंजि. संगम घुमरे, शुभम जाधव, अजय माळी, सुभाष माळी, शिवाजी माळी, आधी सह ग्रामस्थ व आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

