prabodhini news logo
Home चंद्रपूर पुनर्वसित नविन सिनाळा या गावातील ४० खांबावर तात्काळ लाइट लावा.

पुनर्वसित नविन सिनाळा या गावातील ४० खांबावर तात्काळ लाइट लावा.

0
117

वेकोली सब एरिया मॅनेजर यांची भेट घेत नितीन भटारकर यांनी केली मागणी.

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर – वेकोली द्वारा पुनर्वसन झालेल्या नविन सिनाळा या परिसरातील रस्त्यालगत असलेल्या खांबावरील अनेक लाईट बंद असल्याने स्थानिक रहिवासियांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असुन यात जीवितहाणी होण्याची शक्यता देखील निर्माण झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी आज वेकोली दुर्गापूर क्षेत्राचे उपप्रादेशिक व्यवस्थापक गवळी यांची भेट घेत महत्वाच्या या विषयावर चर्चा करून मागणी केली.

अंधारामुळे नागरिकांना रात्री प्रवास करताना अडचणी येतात, यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते आहे. याशिवाय अंधाराचा गैरफायदा घेत परिसरात सध्या चोरी होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

तसेच सदर परिसर हा वन्यप्राण्यांच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे यापूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेतून स्पष्ट झाले आहे. याच गावातील ५ वर्ष्याच्या मुलाला बिबट्याने हल्ला करून घेऊन गेला व त्या लहान मुलाचा मृतदेह छिन्न विच्छींन अवस्थेत दुसऱ्या दिवशी मिळाला. उपाय योजना केल्यानंतर अजूनही वन्यप्राणी फिरतच असल्याचे गाववासियांच्या निदर्शनास येत आहे.

मागील आठवड्यापासून सतत गावात २ मोठ्या अस्वली फिरत आहेत. रस्त्यावर अंधार असल्याने हे वन्यप्राणी नागरिकांच्या लक्ष्यात येत नसल्याने सतर्क होता येत नसल्याने यामुळे भविष्यात एखाद्याचा जीव जाऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारतां येणार नाही.

व म्हणून या सर्व गंभीर परिस्थितीचा विचार करून या पुनर्वसन केलेल्या गावातील जवळपास ४० खांबावर तात्काळ लाईट लावणे बाबत संबंधित विभागाला निर्देश द्यावेत याबाबत आज लेखी पत्र देऊन मागणी केली. याबाबत श्री गवळी साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर लाईट लावून देणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here