prabodhini news logo
Home ठळक बातम्या निमगाव (पहेला) येथे 8 फेब्रुवारी रोजी बुद्ध भिम गितांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन

निमगाव (पहेला) येथे 8 फेब्रुवारी रोजी बुद्ध भिम गितांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन

0
244

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा – तालुक्यातील पहेला जवळील निमगाव येथे दि.8 फेब्रुवारी 2025 रोज शनिवारला रात्री 9 वाजता शुद्धोधन बहुुउद्देशिय संस्था निमगाव संचालित सिद्धार्थ महाबोधी महाविहाराचा 39 वा व समता सैनिक दल शाखेचा 19 वा वर्धापन दिन समारोह निमित्य प्रबोधनपर संगीतमय बुद्ध भिम गितांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यवतमाळ येथील फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीचे
भीमशाहीर व राष्ट्रीय प्रबोधनकार मनोजराजा गोसावी आणि वर्धा येथील सुप्रसिध्द गायिका व प्रबोधनकार प्रज्ञा कीर्ती यांचा प्रबोधनपर संगीतमय बुद्ध भिम गितांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here