तेजस्विनी साहित्य पुरस्काराने चुडाराम बल्हारपुरे पुरस्कृत

0
23

“गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकास पुन्हा एक पुरस्कार

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज : गडचिरोली – तेजस्विनी बहुउद्देशीय संस्था, मारडा (लहान) (जिल्हा चंद्रपूर) या संस्थेतर्फे ‘उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा’ आयोजित करुन विजेत्या साहित्यिकांना तेजस्विनी साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या राज्यस्तरीय पुरस्काराकरीता यावेळी राज्यभरातील एकूण १० साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याची निवड करण्यात आली.
ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर येथील पत्रकार भवन, वरोरा नाका येथे आयोजित तेजस्विनी साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसिद्ध साहित्यिक आशिष देव यांच्या हस्ते, कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक, ‘बिर्हाड’ या गाजलेल्या आत्मकथेचे लेखक अशोक पवार, वणी येथील प्रसिद्ध साहित्यिक अनंता सूर, चंद्रपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक व समिक्षक प्रा. डॉ. श्याम मोहरकर, ब्रम्हपुरी येथील प्रसिद्ध कवी व साहित्यिक प्रा. डॉ. धनराज खानोरकर, सुर्यांश या साहित्य संस्थेचे अध्यक्ष व कवी इरफान शेख व मुल येथील प्रसिद्ध साहित्यिका व माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, संस्थेच्या अध्यक्षा संगीता धोटे व तेजस्विनी धोटे इ. मान्यवरांच्या हस्ते या वर्षातील दर्जेदार साहित्यकृतींना सन्मानित करण्यात आले. त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनाही त्यांच्या “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकाचे लेखनासाठी “मा. वाघुजी गावंडे स्मृती प्रित्यर्थ तेजस्विनी साहित्य प्रेरणा ” पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सीमा भसारकर तर आभार प्रदर्शन तनुजा बोढाले यांनी केले.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या “गोंडवानाचा महायोध्दा: क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकाला यापूर्वी कंथेवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील साहित्य प्रेरणा पुरस्कार व फलटण (जिल्हा सातारा) येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, डॉ. प्रा. श्याम मोहरकर,डॉ. प्रा. जनबंधू मेश्राम, डॉ. प्रा. योगीराज नगराळे, डॉ. प्रा. राजकुमार मुसणे, डॉ.दिपक चौधरी, रमेश निखारे, दै. लोकमतचे संजय तिपाले,दै. हितवादचे रोहिदास राऊत, दै. देशोन्नतीचे नरेश बावणे, दै. सकाळचे मिलिंद उमरे, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे प्रकाशक पराग लोणकर, आदिवासी साहित्यिक प्रा. प्रब्रम्हानंद मडावी, व नंदकिशोर नैताम, व इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here