अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन

0
30

जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन

अकोला प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – पंजाब अमृतसर येथे संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड व संविधानाची प्रतिकृती जाळून टाकण्याचं महापाप याठिकाणी घडलं या घटनेच्या आरोप्याला भर चौकात सार्वजनिक रित्या एनकाउंटर केला पाहिजे आणि त्याचा मास्टर माईंड कोण आहे त्याला शोधून त्याला फाशीची सजा दिली पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले..
ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २५ नोव्हेंबर १९३० मध्ये क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्यासाठी लढाई लढण्याचं काम पहिल्या गोलमेज परिषद मध्ये केले इंग्रजांना अनेक सवाल करून भगतसिंग यांना वाचवण्याचा काम इंग्लंडमध्ये बाबासाहेबांनी केले परंतु या देशात इंग्रज हस्तक असणाऱ्यांच्या व जुलमी इंग्रजांच्यामुळे भगतसिंगांना २३ मार्च १९३१ मध्ये फाशी देण्याचा काम केलं त्यावेळेस बाबासाहेबांनी इंग्रजांचा निषेध केला होता आणि क्रांतिकारक भगतसिंग यांना एक दिवस पहिले फाशी का दिली इंग्रजांना घरावर धरणाचा काम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले.त्याच बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळे मुंबई माटुंगामध्ये गुरू नानक खालसा कॉलेज शीख धर्मियांसाठी व इथल्या बहुजनांसाठी निर्माण झालं खालसा कॉलेज बाबासाहेबांनी निर्माण करून दिलं.ज्या महामानवाने या देशाला रक्ताचं पाणी आणि हाडाचे पीठ करून गौरवशाली संविधान बहल केलं त्याच संविधानाच्या शिल्पकाराचा पुतळा तोडण्याचा आणि संविधान जाळून टाकण्याचं महापाप पंजाब अमृतसर मध्ये एका जातीवादी ने केलं.हे घटना देशाला कलंक लागणारी घटना आहे देशाच्या गृहमंत्र्याने ज्या पद्धतीने पार्लमेंटमध्ये संविधानाच्या शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्या तडीपार अमित शहा मुळे हे प्रकरण मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे एक जबाबदार पदावर देशाचा गृहमंत्री असलेला व्यक्ती जर महामानवांची विटंबना देशाच्या पार्लमेंटमध्ये करत असणार तर त्या गृहमंत्र्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे होते देशाच्या गृहमंत्र्यावर जरी गुन्हे दाखल झाले असते तर आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा संविधानाची प्रतिकृती तोडण्याची जाळून टाकण्याची कोणाचीच हिम्मत झाली नसती पण या गृहमंत्र्यामुळे आणि देशाच्या प्रधानमंत्री मुळे या देशात या महामानवांचे विटंबना केल्या जात आहे.ज्या व्यक्तीमुळे या देशात संविधान अस्तित्वात आलं त्या संविधानामुळे या देशात पार्लमेंट अस्तित्वात आली त्याच पार्लमेंट मध्ये या महामानवांचा अपमान केल्या जात आहे हे पहिले थांबलं पाहिजे आणि जो कोणी महामानवांचा पुतळा व संविधान जाळून किंवा तोडले त्याला देशद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे आणि ज्या जातीवाद्यांना पुतळा तोडला त्या जातीवादी भाळखाऊला सार्वजनिक रित्या भर चौकात त्याच्या छाताड्यात गोळ्या घालून त्याचा एन्काऊंटर केला पाहिजे जेणेकरून संविधान निर्माण करणाऱ्यांचे पुतळे आणि संविधान जाळणार नाही असं काम या देशात केलं पाहिजे असा मी मागणी करतो आणि या घटनेत ज्या जातिवादाने अमृतसर पंजाब मध्ये संविधानाच्या शिल्पकाराची मूर्ती तोडण्याचं काम केलं त्याला भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजे याचा एन्काऊंटर केलं पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here