नाशिक जिल्हा प्रतिनिधी जगदीश वडजे 9175794502 – मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता विद्यालय व अभिनव बाल विकास मंदिर वरखेडा विद्यालयात सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला त्या निमित्ताने महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन पतंजली यांच्या मार्गदर्शनाने किसान सेवा समिती दिंडोरी तालुका अध्यक्ष योगगुरु वसंतराव उफाडे यांच्या प्रेरणेने विद्यालयात मयुरासन,वज्रासन, मत्स्यासन,धनुरासन, पदमासन,चक्रlसन अशा अनेक योगासनांचा सराव करून स्पर्धा घेण्यात आली,त्यातील उत्कृष्ट सूर्यनमस्कार करणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा मेडल पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये 6 वी ची ईश्वरी उफाडे, 8 वी ची प्रियंका भुसाळ,रितिका भोई,5 वी चा साहिल गांगुर्डे या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार करून मेडल मिळवले.मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा मेडल प्रदान करण्यात आले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन भामरे, जगदीश वडजे, (बजरंग दल दिंडोरी तालुका संयोजक) कांता देव (बजरंग दल दिंडोरी तालुका प्रखंड संयोजक), जेष्ठ शिक्षक रामदास महाले,श्रीम.साधना माळेकर, सोमनाथ शिंदे,संजीव पठाडे, क्रीडा शिक्षक सुभाष मालसाने, सिमा गायकवाड,सारिता कांगणे,संजय जाधव,मनिषा उफाडे, पायल उफाडे,शिक्षकेत्तर कर्मचारी कैलास उगले,कैलास धात्रक, प्रयोग शाळा सहाय्यक प्रविण मोरे,प्रमोद जाधव आदी कर्मचाऱ्यांबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

