प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – कला,साहित्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी संस्था सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान मुंबई या संस्थेचा यावर्षीचा पुज्य साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध साहित्यिक प्रविण खोलंबे यांना प्रदान करण्यात आला.
कला, साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्य व कर्तृत्वाचा ठसा ज्यांनी उमटवला.असे मुरबाड तालुक्याचे सुपुत्र प्रसिद्ध लेखक कवी, निवेदक, समीक्षक,व्याख्याते प्रविण खोलंबे.यांना पुज्य साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंती निमित्त पुज्य साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाषदादा गायकवाड, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ भालचंद्र मुणगेकर,आमदार अजय चौधरी अॅड.वर्षा देशपांडे, शिवाजीराव सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा चारुशीला देशमुख. लोकसाहित्याचे अभ्यासक मा.राणे सर,शाहिर दत्ताराम म्हात्रे व सदरील कार्यक्रमाचे संयोजक सुरज भोईर अशा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महर्षी दयानंद महाविद्यालय परळ, या ठिकाणी दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी कार्यक्रम संपन्न झाला.

