prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – रमाई

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – रमाई

0
279

दिन दुबळ्याची आई
झाली माझी रमाई
सोसून सारे दुःख
झाली जगताची आई।।

ना मागितले कधी
तिने कोणतेही सोने
माझं कुंकवाच धनी
हेच माझं दागिने।।

विद्वान तिचा पती
कधी गर्व नाही केला
शेणाच्या गोवऱ्या थापून
तिने संसार फुलविला।।

साथ देऊन भीमाला
पत्नी धर्म तिने पाळीला
भिमाच्याचसाठी तिने
आयुष्य पणाला लाविला।।

साधी भोळी रमाई माझी
होती रूपाची ती खाणं
नशिबान मिळालं तिला
भिमा धनी गुणवान ।

अशी ती रमाई झाली
अवघ्या विश्वाची आई
जगात थोर माता होऊन
जगी गाजली रमाई।।

कवयित्री प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here