ज्ञान सूर्याची सावली
माता रमाई महान
भीमरायांना घडविले
विचारांचे देऊन योगदान…
रमाईचा त्याग अनमोल
मेहनत कष्टांची माळ
भीमाचा होऊन आधार
संघर्षाची बनलीस ढाल…
सूर्याची सावली रमाई
कणखर आणि निष्ठावंत
भीमरायांना देत आधार
निस्वार्थ राबली कर्तव्यात…
सूर्याची सावली रमाई
कर्तृत्ववान त्याग प्रतिमा
भीमरायांच्या साथीने
ओलांडली संसार सीमा…
माता रमाईचे अस्तित्व
जगण्यास प्रेरणा देते
प्रेमत्याग कसा असावा
इतिहास जगास सांगते…
इतिहासाच्या पानांत
रमाईचे नाव सोनेरी
भीमरावांच्या यशाची
होतीस तूच ढाल भारी…
प्रज्ञासूर्याच्या सवलीस
मनोभावे त्रिवार वंदन
रमाईच्या पावन स्मृतीस
विनम्रपणे अभिवादन…
कवयित्री संध्या रायठक/ धुतडे
नांदेड

