माता रमाई सगळ्यांची आई
समजूतदार फार होती
लपवून दुःख भीमरावापासून
साथ त्यांना देत होती
कष्टमय जीवन तिचे
देन्य संसारात होते
फाटक्या लुगड्यात रमली
दुःख पाठ सोडत नव्हते
आपली माणसे गमावली
तरी साथ दिनदलितांस दिली
भाग्यशाली त्यागमुर्ती
ती भीमाची रमाई किती
पुण्यशील निस्वार्थ होती
ध्येयाची ती मुर्ती झाली
कारूण्य सिंधू रमाई
सावली बनून राहिली
कवयित्री गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

