वंदनगावच्या! रूक्मीण
बाईची! रमाई भिकूची
कन्यारत्न !!१!!
रमाचा विवाह!बाबा
साहेबांशी !दाम्पत्य ही कशी !
भाग्यवान !!२!!
केले कष्ट किती!झेलल्या
यातना! केला सामना!
वादळांचा !!३!!
उपसले कष्ट !गवऱ्या नी
शेण ! केली वनवन!
जन्मभर !!४!!
आहुत्या दिल्यात!इच्छा
अपेक्षांच्या!झळा गरीबीच्या
शाेषुनिया !!५!!
तांडव मृत्युचे! पाहिले
दारीच ! जणु परीक्षाच
जीवनात !!६!!
आई दलीतांची!होती ती
सावली! धार्मिक माऊली!
सदाचारी !!७!
महीला सभांना! करून
प्रेरीत ! जोपासलं हित!
समाजाचं !!८!!
नेहमी बाबांना! प्रोत्साहन,
धीर! मोठा बँरीस्टर!
बनवण्या !!९!!
पाठवी बाबांना!उच्च
शिक्षणाला!दूर विदेशाला!
औक्षणाने !!१०!!
कसं विसरावं !कतृत्व
रमाचं ! मनांमनांतच !
ती अमर!!११!!
कवयित्री तहेसीन मसुदअली सय्यद
लातूर

