चंद्रपूर येथे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन

0
66

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक चंद्रपूर – चंद्रपूर : विसापूर येथील सैनिक स्कूलमध्ये आयोजित नागपूर विभागस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, विभागीय अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी दगडु कुंभार, उपजिल्हाधिकारी संजय पवार, सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर, करिश्मा संख्ये आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, सध्याची जीवनशैली तणावपूर्ण झाली आहे. त्यामुळे कामासोबतच विरंगुळा व शारीरिक तंदुरुस्ती जपणे आवश्यक आाहे. त्याकरिता खेळ व कला हे उत्कृष्ट साधन असून सर्वांनी खेळाच्या माध्यमातून आपले कलागुण विकसीत करावे.

आमदार देवराव भोंगळे म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी जनतेच्या कल्याणासाठी वर्षभर राबत असतात. अशावेळी त्यातून थोडासा वेळ काढून एखादा खेळ व एखादी कला जोपासावी. जेणेकरून मनावरील ताण कमी होईल व शारीरिक दृष्ट्या निरोगी राहता येईल.

या स्पर्धा 7, 8, व 9 फेब्रुवारी असे तीन दिवस होणार 9 तारखेला बक्षीस वितरण समारंभ आहे. यावेळी नागपूर विभागातील वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर, चंद्रपूर व आयुक्त कार्यालय नागपूरचे संघ उपस्थित होते. या स्पर्धांचे आयोजन जिल्हाधिकारी विनय गौडा आणि निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्य मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये एकूण 20 प्रकारचे खेळ तर सांस्कृतिक कार्यक्रमात गायन, वादन, नृत्य, अभिनय असे विविध कलाविषयक बाबींचा देखील समावेश आहे.

कार्यक्रमाचे संचालन सपना पिंपळकर यांनी तर आभार अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व संघटनांचे अध्यक्ष यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील व नागपूर विभागातील अनेक तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, कर्मचारी, अधिकारी व स्पर्धक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here