प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – चंद्रपुर:स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी चंद्रपूरातील प्रसिद्ध आहार तज्ञ् डॉ. अंकिता चौधरी यांचे आहार आणि पोषण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. विधी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांच्या अध्यक्षते खाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयातील पदवीत्तर विभाग प्रमुख प्रा. डॉ. पंकज काकडे, इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. पूर्णेदू कुमार कार, रा. से. यो. विभाग प्रमुख डॉ. सरोज कुमार दत्ता, आहार व पोषण क्लब चे संजय चांदेकर, महाविद्यालय चे संगणक विभाग प्रमुख यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ. अनिता चौधरी यांनी पोषण युक्त आहार याचे महत्व विषद करताना आज च्या फास्ट फूड च्या जाळ्यात गुरफटलेल्या लोकांना पोषण युक्त आहारचे महत्व सांगणे सूर्याला दिवा दाखवण्या सारखेच आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. पंकज काकडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संतुलित आहारचे महत्व आज प्रत्यकांनी स्वीकारणे गरजेचे असल्याचे विषद केले. महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी आज च्या धकाधकीच्या जीवन शैलीत प्रत्येकाने योग्य आहार अंगीरकारण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद तसेच विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. सरोज कुमार दत्ता तसेच आभार प्रदर्शन ऍड. प्रिया पाटील यांनी केले.

