सुप्रसिद्ध साहित्यिका रोहिणी पराडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनचा महाराष्ट्र साहित्य रत्न पुरस्कार प्रदान

0
35

कोल्हापुर प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनचा महाराष्ट्र साहित्य रत्न पुरस्कार घाटकोपर मुंबई येथे शहीद स्मारक सभागृह रमाबाई आंबेडकर नगर येथे प्रसिद्ध अभिनेत्री व नाट्य कलाकार मा. रंजिता पाटील यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.
रोहिणी पराडकर या कोल्हापूर महिला जिल्हा अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत .त्यांनी सामाजिक कार्यात सहभागी होऊन मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या बाल कविता संग्रहाला तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्या अनेक पदांवर कार्यरत आहेत. या वेळी अभिनेते विजय पाटकर, अँड अजय तापकीर,मा दिगंबर कोळी,मा उत्तमराव तरकसे,मा.आशिष सातपुते,मा.महेश वावले, मा.सुरेश बने उपस्थित होते .डॉ बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन चे संस्थापक आयुषमान सुधीर कांबळे व त्यांचे सर्व सहकारी व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्तम प्रकारे पार पाडले.
या कार्यक्रमास राज्यातील साहित्यिक व कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here