prabodhini news logo
Home चंद्रपूर जि. प. सदस्या स्मिता राजेश पारधी यांच्या प्रयत्नातून ब्रम्हपुरी तालुक्यातील 12 गरीब...

जि. प. सदस्या स्मिता राजेश पारधी यांच्या प्रयत्नातून ब्रम्हपुरी तालुक्यातील 12 गरीब गरजू लाभार्थ्यांना ई रिक्षा वाटप

0
99

रविंद्र मैंद प्रबोधिनी न्यूज चॅनल ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी – जिल्हा परिषद चंद्रपूर समाजकल्याण विभागाअंतर्गत 20%सेसफंड योजनेतून सन 2024-25 या वर्षात ब्रम्हपुरी तालुक्यातील 12 गरीब गरजू लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी ई रिक्षे मंजूर झालेले असून स्मिता राजेश पारधी जि. प. सदस्या यांनी मागील वर्षी सन 2023-24 या वर्षात सुद्धा 13 लाभार्थ्यांना आपल्या प्रयत्नातून ई रिक्षा मंजूर करून वाटप झाले होते आपल्या 5 वर्षाच्या काळात जवळपास 50 लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी ई रिक्षा मंजूर करून त्या बद्दल स्मिता राजेश पारधी यांचे एक महिला कर्तव्यदक्ष जि. प. सदस्या म्हणून अभिनंदन केल्या जात आहे व बाकी जि. प. अंतर्गत वयक्तिक योजना सुद्धा मंजूर करते वेळेस समाजकल्याण विभाग, पशु विभाग, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभागा मधून सुद्धा 40 % लाभार्थी आपल्या शिफारशीने कसे मंजूर होतील या साठी प्रयत्न करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्न करायच्या त्या बद्दल सर्व स्तरावर अभिनंदन केल्या जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here