
कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677-कोपरगाव तालुक्यातील चास नळी गावातील ग्रामदैवत जगदंबा माता यात्रा उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला या यात्रा उत्सव निमित्ताने आज श्रीराम सृष्टी परिसर येथे डे नाईट हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाली असून. या हॉलीबॉल स्पर्धे साठी सांगवी भुसार. मुखेड -चासनळी -पेठ सुरगाणा -संगमनेर दौलत – पाथरे -उंबरठाणा -नाशिक – जीपीएस गौतम नगर- प्राथमिक शिक्षक वृंद- चास नळी- लोणी पोलीस- कोठूर- इत्यादी संघाचा समावेश होता.
प्रथम पारितोषिक: पाथरे, द्वितीय पारितोषिक: राहुरी, तृतीय पारितोषिक: सांगवी भुसार, चतुर्थ पारितोषक: पेठ सुरगाणा विजेत्या झालेल्या टीमला यात्रा कमिटी मान्यवरांच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात आले.
उत्कृष्ट नेटमन : संजय गायकवाड (संघ पेठ सुरगाणा)
आलेल्या सर्व टीमचे चास नळी गावच्या. माय भूमी सोशल फाउंडेशन मंडळ. श्रीराम सृष्टी सेवाभावी मंडळ. व यात्रा कमिटी चास नळी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.














