कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख
9860910063,7620208180 – वै.गु.ह.भ. जोग महाराज पुण्यतिथी उत्सव निमित्त, श्री क्षेत्र हिंगणी येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व, अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्यास आज सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. साखर कारखान्याचे चेअरमन मा. विवेकभैय्या कोल्हे साहेबांनी भेट दिली. यावेळी उपस्थितांसमवेत ह.भ.प.उत्तममहाराज बढे यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाचा आनंद घेतला. या प्रसंगी महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून अनेक दाखले देत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मा. विवेक कोल्हे साहेबांनी गुरुवर्य रघुनाथ महाराज खटाणे महाराजांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले.
या प्रसंगी बापूसाहेब धर्मा पवार, दत्तात्रय प्रभाकर पवार, त्रिभुवन अण्णासाहेब पवार, काकासाहेब भास्कर पवार, पांडुरंग वामन पवार, दादासाहेब नानासाहेब पवार आदी मान्यवर तसेच हिंगणी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

