सम्पूर्ण देश 14 फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस अत्यंत हसी खुशीने हसत खेळत साजरा करीत होता तेव्हा भारताचे सैनिक जम्मू आणि काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्गावर लेथापोरा या अवंतीपोरा जवळ असलेल्या केंद्रीय रिझर्व्ह पोलिस फोर्सच्या सैनिकांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलाच्या वहानांच्या एका ताफ्यावर दुपारी 3:15,मिनिटानी हल्ला करण्यात आला .आणि सर्वत्र हाहाकार माजला. यात आतंकवादी यांनी भयानक मोठा हल्ला केला की यात भारताचे 40 जवान शहीद झाले ,अनेक जण जखमी झाले .यात कुणाचे हात तुटले तर कुणाचे माय मोडले, आणि बघता बघता पुलवामा शहरात खूप मोठी दहशत पसरली या घटनेने सम्पूर्ण भरत देश हादरून गेला.
पुलवामा हल्ल्यात अनेक सैनिकांना वीर मरण आले. संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. आणि प्रेम या दिवसाचे रूपांतर एक काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.
मित्रांनो जर खरच प्रेम करायचे असेल तर आपल्या मातृभूमीवर करा, आपल्या देशावर करा आपल्या आई वडिलावर करा ,आपल्या पत्नीवर करा आपल्या भावा बहिणीवर करा .या मातीच्या कणा कणावर प्रेम करा, आणि अथांग अशा समिंदवर प्रेम करा.तरच आपले जीवन सफल होईल.
जे देशाचे सैनिक आपली आई मूल बाळ पत्नी भाऊ बहिण मैत्रीण यांना सोडून देशाचे मातृभमीचे संरक्षण करतात त्यांच्या कार्याला खरोखरच सलाम…
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर

