प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क मुंबई / दरभंगा दि.15 – बिहार मधील बुद्धगया येथे तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली.बुद्धांचा विश्र्वशांती चा विचार ; मानवतेचा विचार ; बौद्ध धम्माचा प्रसार संपूर्ण आशिया खंडात ; संपूर्ण जगात झाला.जगभर पोहोचलेल्या बुद्ध विचारांचे मूळ विहार हे बिहार राज्य आहे.त्यामुळे बुद्धविचारांचे मूळ विहार म्हणून बिहार बद्दल आम्हाला आदर आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.दरभंगा येथे बुनकर समाजाचे ज्येष्ठ नेते दिवंगत व्हि के पटवा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या सामाजिक न्याय भवन स्मारकाच्या लोकार्पण प्रसंगी ना. रामदास आठवले बोलत होते.
दिवंगत व्ही के पटवा हे बिहार मधील प्रसिद्ध दलित नेते होते.त्यांचा बुनकर समाज हा बिहार मध्ये अनुसूचित जातीत समाविष्ट होतो.दिवंगत व्ही के पटवा यांच्या शी आपले जवळचे संबंध होते.त्यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर रिपब्लिकन पक्षावर अतूट विश्वास आणि प्रेम होते.जेंव्हा जेंव्हा मी बिहार आलो तेंव्हा तेंव्हा ते मला पटना येथे भेट असत.त्यांचे बिहार मधील दलितांसाठी मोठे काम केले आहे. त्यांच्या स्मृती जोपासल्या जाव्यात म्हणून दरभंगा येथे त्यांचा पुतळा आणि स्मारक उभारण्यात आले आहे.त्याचे लोकार्पण आज आपल्या हस्ते झाल्याचे ना.रामदास आठवले यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी झालेल्या जाहीर सभेत बिहार चे बुद्ध विचारांशी मूळ नाते असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वर येथे प्रवासी भारतीय कार्यक्रमात जगाला युद्ध नाही तर जगाला बुद्ध हवा आहे चा विचार मांडला होता त्याची आठवण न.रामदास आठवले यांनी यावेळी सांगितली.
दरभंगा आणि बेगुसराय या बिहार मधील मैथिली कला संस्कृतीच्या जिल्ह्यांचा दौरा ना.रामदास आठवले यांनी आज केला.यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली.

