उषा पानसरे
मुख्य कार्यकारी संपादीका
अमरावती
9921400542
राज्यातील पोलीस पाटील यांच्या हितासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करत असणार्या महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील (असो.)संघटनेचा राज्यस्तरीय पोलीस पाटील मेळावा व नवनियुक्त पदाधिकारी पदग्रहण समारंभ महेश्वरी भवन शेगाव येथे नुकताच संपन्न झाला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे नवनियुक्त राज्याध्यक्ष नंदू हिवसे पाटील होते तर प्रमुख मार्गदर्शक माजी राज्य अध्यक्ष मुरकुटे आबा पाटील, संस्थापक सचिव दिलीप जाधव पाटील, राज्य कार्याध्यक्ष राहूल उके पाटील, महासचिव निरंजन गायकवाड पाटील, राज्य उपाध्यक्ष प्रेमचंद राठोड पाटील,मराठवाडा विभागीय अध्यक्ष गजानन मोरे पाटील होते.
कार्यक्रमाची सुरुवात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.विनायक पांडे पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली.
संघटनेचा राज्य भरात विस्तार असुन पोलीस पाटील यांना नियुक्ती पत्र देत राज्य पदाधिकारी यांनी जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष यांची निवड केली. राज्यातील पोलीस पाटील यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असुन ते सोडविण्याची जबाबदारी राज्य अध्यक्ष व पदाधिकारी यांची असुन पोलीस पाटील यांना न्याय देण्याचे काम संघटनेच्या वतीने करण्यात येईल असे प्रतिपादन नवनियुक्त राज्य अध्यक्ष नंदू हिवसे पाटील केले.
महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील ( असो.) संघटनेचा राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधन वाढीत सिंहाचा वाटा असुन गेल्या अनेक वर्षांपासून करीत असलेल्या पाठपुराव्यामुळे आणि काढलेल्या मोर्चा मुळे ते शक्य झाले असून येत्या काळात सुध्दा प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर वेगवान पाठपुरावा करणार असल्याचे राज्य कार्याध्यक्ष तथा अमरावती जिल्हाध्यक्ष राहूल उके पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून व्यक्त केले.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून पोलीस पाटील या मेळाव्याला उपस्थित राहून प्रत्येक जिल्ह्यात पोलीस पाटील संघटित करून पोलीस पाटील हितासाठी कार्य करणार असून पुढील दोन वर्षात पंचवीस हजार सभासद संघटनेच्या सोबत जोडून संघटना म्हणजे कुटुंब असे कार्य करणार आणि त्यासाठी जिल्हानिहाय मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात सांगण्यात आले.
राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील यांचा मेळाव्यात सत्कार करण्यात आला.
मेळावा यशस्वी करण्याकरिता सर्व जिल्हाध्यक्ष,पदाधिकारी व पोलीस पाटील यांनी नियोजन केले.

