लोखंडाहून विशाल बळ हे
शिवरायांच्या अगाध कर्तुत्वात
लोहपुरुष हे शिवरायांच्या सम
धरतीवर राजा कधी न झाला राष्ट्रात
जिजाऊ चा लेक हे शिवनेरीचे वाली
बुद्धिवान ,कला कौशल्याचे पुजारी
कथन, कर्मानी जिजाऊने घडविले रत्न
धडे दिले शौर्याचे कर्तुत्वानी केले आज्ञाकारी
तलवारीची धार शिवबाचे चपळ
असे त्यांची घोडसवारी पराक्रमी राजा
तुकोबाचे विचार आपण करीत होते पालन
युद्धनीती ,परिस्थितीशी झुंजला शिवबा माझा
न्याय प्रिय ,कर्तव्य कठोर, दूरदृष्टी जानक
शिवबांच्या अथक प्रयत्नाने झाले महानायक
योद्धांच्या माळेचा हिरा आहे शिवबा
मुगल सेनेला केले त्यांनी परास्त सेवक
रंजना भैसारे
नागपूर

