कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दसरा चौक शाहु स्मारक भवन कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मीय जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्ताने शिवार न्युज चे पत्रकार प्रल्हाद साळुंखे यांना शिव प्रेरणा आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्याना सन्मान चिन्ह शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन मा, हातकणंगले तालुक्याचे आमदार अशोक माने, सतोंष आठवले संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी, मा सचिन रमेश माने, अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मीय महोत्सव समिती, मा आमोल कुरणे संस्थापक अध्यक्ष परिवर्तन फौडीशन व मचिंद्र रूईकर, स्वराज्य क्रांती सेना पॅंथर आर्मी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष यांच्या शुभहस्ते देऊन गौरवण्यात आले त्यावेळी जिल्ह्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

