नाशिक प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – 21 फेब्रुवारी 2025 – एका मूकबधिर महिलेला केवळ एका तासात पिवळे रेशन कार्ड वाटप करण्यात आले. तहसील कार्यालय, नाशिक येथे धान्य दुकानदार दत्तू शिंदे, वाघ आणि सामाजिक कार्यकर्ते दिपक सरोदे यांच्या हस्ते हा महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला.
तहसीलदार शोभा पुजारी आणि निरीक्षक रमेश गायकवाड यांनी या महिलेसाठी अंत्योदय योजना तत्काळ सुरू करून देण्याचे आश्वासन दिले.
यासाठी शिंदे, वाघ, फिरोज शेख आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या मदतीबद्दल मूकबधिर महिलेच्या भावाने तसेच उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
मूकबधिर महिलेसाठी हा क्षण अत्यंत भावनिक होता. आपल्या भावना शब्दांत व्यक्त करू न शकणाऱ्या या महिलेच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिच्या मौन अश्रूंनी तिचे कृतज्ञता व्यक्त केली आणि उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी आणले.

