प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क चंद्रपूर – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्या मार्गदर्शनात आज आप पक्षाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सुरज शाहा व युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी आप च्या वरोरा तालुका अध्यक्ष गौरव मेले आणि समस्त वरोरा व भद्रावती तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशामुळे शिवसेनेच्या संघटनेला अधिक बळकटी मिळेल आणि युवा कार्यकर्त्यांचा पक्षप्रती उत्साह वाढेल. पक्षप्रवेशाच्या या प्रसंगी राज्याचे मंत्री संजय राठोड, आमदार मीनाक्षी कायंदे, आमदार कृपाल तुमाने जी, पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव साहेब व अनेक मान्यवर उपस्थित होते.
मा. उपमुख्यमंत्र्यांनी या दोन्ही युवा नेत्यांचे स्वागत करत, त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचे कौतुक केले व भविष्यात शिवसेनेच्या माध्यमातून लोकहिताचे कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

