नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती प्लॉट नंबर 15 अप्सरा लॉन जवळ हुडकेश्वर रोड नागपूर तर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही दिनांक 31 मे 2025 शनिवार रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहाने,आनंदाने व धूमधडाक्यात साजरी करण्यात आली असून त्यानिमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती मंदिर सौभाग्य नगर हुडकेश्वर येथील राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला सकाळी 6.30 वाजता अभिषेक करण्यात आला. आणि त्यानंतर 7.30 वाजता मोटार/ कार, बाईक रॅली ला सुरूवात करण्यात आली. मधूकर काळमेघ अध्यक्ष,महादेवराव पातोंड सचिव सौ वंदना विनोद बरडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष यांनी राॅलीला हिरवी झेंडी दाखवुन राॅलीला सुरुवात करण्यात आली. राॅली च्या मार्गा मध्ये परशूरामजी ठाकूर, म्हस्के माजी नगर सेवक तसेच भाजपा कार्यकर्ते श्याम थोरात यांनी व इतर समाज बांधवांनी अहिल्या मातेचे पूजन केले, पोस्टर व झेंडे लावून तसेच चहा-बिस्किट, पाणी, सरबत इत्यादी वाटप करून रॅलीचे स्वागत केले.
रॅली ही अहिल्यादेवी होळकर स्मृती मंदिर सौभाग्य नगर अप्सरा लॉन पासून सुरू झाली ती म्हाळगी नगर चौक ते गजानन शाळा ते अयोध्या नगर ते छोट्या ताजबाग मागील रस्ताने तुकडोजी महाराज पुतळा ते वंजारी नगर पाण्याच्या टाकी जवळून अजनी रेल्वे पुलावरून अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंत (अजनी रेल्वे स्टेशन) आणण्यात आली येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.येथे अहिल्यादेवीच्या प्रतिमेला अभिवादन करण्याकरिता बी एस पी चे श्री उत्तम शेवडे व त्यांचे सहकारी सामील झाले होते.मोटार कार, बाईक रॅली मध्ये जवळपास 300 समाज बांधव सामील होते यामध्ये श्री मधुकर काळमेघ,महादेव पातोंड,डॉ.रमेशजी ढवळे,विठ्ठलराव निगोट,भालचंद्र महाजन,राम सोनाग्रे,डॉ विनोद बरडे,शरद उरकुडे,अनिल तांबडे,राम लोही,राजेश लोही,सतीश होपड डॉ.,दीपक कापडे,विनोद भुजाडे,विनोद अवझे, विपीन निखाडे तसेच डॉ.सौ.सुनीता महात्मे,वंदना बरडे,अश्विनी उरकुडे,संजीवनी घुरडे,विद्या सोनाग्रे,रजनीताई काळमेघ, ज्योती कापडे ,कामिनी तवले, स्मिता तांबडे, मीनाक्षी लोही,विनिता पुनसे,अनिता त्रिकुळ ,सुधाताई अवझे इत्यादी महिला व पुरुष मोठ्या संख्येने सामील झाले होते. रॅलीचे पथदर्शन श्री शरद उरकुडे,विनोद बरडे, सतीश होपड,अनिल तांबडे,विपीन निखाडे यांनी केले तर समारोपीय भाषण श्री महादेवराव पातोंड, डॉ. रमेशजी ढवळे डॉ सुनिता महात्मे, वंदना विनोद बरडे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त अनमोल भाषणं केले.
३०० वे वर्ष किती महत्त्वाचे आहे आणि त्यांचें कार्य जगभर आहे अश्या कर्तुत्ववान महीलेच्या जयंती च्या हार्दिक शुभेच्छा.आभार प्रदर्शन श्री. राम सोनाग्रे यांनी केल्यानंतर रॅलीची सांगता झाली.

