तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर: सिस्टर कॉलनीतील नागरिकांना गेल्या काही काळापासून नळाद्वारे पाणी मिळत नसून, वाढत्या उन्हाळ्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. या संदर्भात वंचित बहुजन महिला आघाडीच्या महानगर अध्यक्षा तनुजा रायपूरे यांच्या नेतृत्वाखाली मा. आयुक्त साहेबांना स्मरणपत्र देण्यात आले.
तनुजा रायपूरे यांनी आयुक्त साहेबांना महिलांच्या अडचणी स्पष्ट करत नळाला पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. जर नळाद्वारे पाणीपुरवठा शक्य नसेल, तर पर्यायी उपाय म्हणून बोरींगची व्यवस्था करता येईल का? असा सवाल उपस्थित केला.
यावर आयुक्त साहेबांनी स्वतः येऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे आश्वासन दिले. तसेच, नळाला पाणी का येत नाही याचा तपास करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अन्यथा बोरींगची व्यवस्था केली जाईल, असे सांगितले.
महिला आघाडीच्या वतीने महिलांच्या समस्यांना त्वरित प्राधान्य देऊन उपाययोजना कराव्यात, अशी विनंती आयुक्त यांना करण्यात आली.
महानगर अध्यक्षा तनुजा रायपूरे उपाध्यक्षा इंदूताई डोंगरे, महासचिव मोनाली पाटील, जेष्ठ कार्यकर्त्या यशोधरा कवाडे जयश्री धाबर्डे केसर, चव्हाण कोसे, चिमुरकर आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

