प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – न्युज 7 मराठी चे मुख्य संपादक सतीश आकुलवार यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र च्या विदर्भ समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे.
26 फेब्रुवारी रोजी शासकीय विश्राम गृह येथे छोटेखानी कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी नियुक्ती पत्र देऊन सतीश आकुलवार यांची संघटनेच्या विदर्भ समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र समन्वयक इक्बाल शेख हे प्रामुख्याने उपस्थित होते.

