बिजोनी येथे दूध उत्पादकांचा मुरघास चारा प्रात्यक्षिक कार्यक्रम

0
45

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था व एम3एम फाउंडेशन, डी.ओ.सी.सी – एस.पी.जे.आय. एम.आर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बिजोनी येथे दूध उत्पादकांचा मुरघास प्रात्यक्षिक चारा कार्यक्रम नुकताच पार पडला. सदर कार्यक्रम आदिवासी उपजीविका विकास कार्यक्रम प्रकल्प अंतर्गत आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक अनिल पेंदाम, आदेश धोन, डॉ. सतीश अगडते पशुवैद्यकीय अधिकारी, रुपेश वर्भे, प्रफुल वर्भे, भुमेशकुमार तांडेकर कृषी विकास प्रकल्प समन्वयक, खुशाल खीरटकर प्रेरक मदर डेअरी, अविनाश खामनकर उपस्थित होते .
यावेळी मुरघास कसा तयार करतात याचे प्रात्यक्षिक अमोल खिरटकर यांच्या गोठ्यात देण्यात आले. मुरघास ज्वारीपासून तयार करण्यात आले. ज्वारीचे साधारण बारीक एक ते दीड इंच लांबीचे तुकडे करून मुरघास बॅग मध्ये भरण्यात आले. योग्य तापमानावर आणि आद्रतेच्या नियंत्रणाखाली बॅग ठेवण्यात आली. साधारण पाच ते सहा आठवड्यांनी मुरघास तयार होईल आणि वापरण्यासाठी तयार असेल.
यावेळी चारा व्यवस्थापन प्रात्यक्षिक दूध उत्पादक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. या कार्यक्रमात फकरू तिखट, अभय गाडगे, नागेश्वर बोथले, सुरज ठेंगणे, अमोल बांदुरकर, रमेश चौधरी, शैलेंद्र वराडे, शुभम दाते, प्रबुद्ध डोये उपस्थित यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here