prabodhini news logo
Home कोपरगाव महसूल प्रशासनाची वाळू तस्करांविषयी दमदार कामगिरी

महसूल प्रशासनाची वाळू तस्करांविषयी दमदार कामगिरी

0
243

कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख
मो.7620208180,9860910063 – कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे आज महसूल प्रशासनाने वाळू तस्करांचे धाबेदनानून टाकले. शिर्डीचे प्रांत अधिकारी माणिकराव आहेर साहेब यांच्या नियंत्रणाखाली आज दिनांक पाच मार्च रोजी सकाळी 11 वाजेपासून कारवाई चालू होती त्यामध्ये कोपरगाव चे तहसीलदार महेश सावंत ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी उपनिरीक्षक चौधरी प्रफुल्लीता सातपुते नायब तहसीलदार कोपरगाव मनोज भोसेकर अशोक कुलथे सतीश घोडेकर विष्णू काटकर पीएम डहाळे शिरसाट पोकळे ढुमणे साहेब घोरपडे डी आर सांगळे एचडी भांडगे माळवदे साहेब तसेच राहता तहसील चे कर्मचारी व तहसीलदार साहेब यांच्या नियंत्रणाखाली आज रोजी वाळू तस्करांच्या ज्या बोटी होत्या त्यांची तोडफोड करून पेटून देण्यात आल्या यामध्ये महसूल विभागाची दमदार कामगिरी बघून ग्रामस्थांनी त्यांची पाठराखण करत असेच जर काम जोमाने होत राहिले तर दोन नंबर वाल्यांचा सुपडा साफ होईल अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. आजच्या या कारवाईमध्ये प्रांत साहेब यांच्या आदेशावरून आज तीन बोटी जाळून देण्यात आल्या समक्ष पंचनामा करून त्यांची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली त्याबद्दल सर्वत्र महसूल विभागाचे कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here