आनंददायी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सेवानिवृत्त 20 कर्मचाऱ्यांचा सन्मान

0
55

ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि 05 – जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आज, दि. 05 मार्च 2025 रोजी, जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम शिक्षकांनी केले आहे. ठाणे ग्रामीण भागात 35 वर्ष पेक्षा अधिक काळ कामकाज केल्याबद्दल सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी- कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी (सा.प्र.वि) कल्पना तोरवणे, सहाय्यक प्रशासन अधिकारी (शिक्षण प्राथमिक) श्रीकांत खंडागळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी (सा.प्र.वि) मनोज देवकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी (शिक्षण प्राथमिक) शंकर आरे तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे यांच्या शुभहस्ते 20 सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, पेन्शन आदेश देऊन सन्मान करण्यात आला.‌

केंद्रप्रमुख किशोर भोईर यांनी जिल्हा परिषदेत सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम नियोजन केल्याबद्दल आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी कामकाज करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांना आज विविध क्षेत्रात काम करताना पाहून काम केल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

जानेवारी महिन्यातील शिक्षण विभाग प्राथमिक 06, बांधकाम 02 असे एकूण 08 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत तर फेब्रुवारी महिन्यातील शिक्षण विभाग प्राथमिक 09, आरोग्य विभाग 02, बांधकाम 01 असे एकूण 12 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. असे एकूण 20 सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान सोहळा आज पार पाडला. विस्तार अधिकारी (शिक्षण), प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, पदवीदर शिक्षक, आरोग्य सेविका (महिला), आरोग्य सहाय्यक (पुरुष), कनिष्ठ अभियंता, मैल कामगार या पदावरील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत.
000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here