चौगान येथील लाभार्थ्यांना घरबांधकामासाठी जमीनीच्या पट्टयांचे वितरण

0
60

ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – ब्रम्हपूरी तालुक्यातील चौगान येथील भुमीहीन लाभार्थ्यांना घरबांधकामासाठी जमीनीच्या पट्टयांचे वितरण करण्यात आले आहे. या वितरण प्रसंगी ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चौगान येथील 7 लाभार्थ्यांना घरबांधकामासाठी पट्टयांचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये सुकरू मेश्राम, सारंग वाघधरे, बंडु चिचुळकर, बालाजी सहारे, प्रभाकर खेडकर, रमेश सहारे, वसंता मेश्राम ह्या लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. यापुर्वी येथील 25 लाभार्थ्यांना पट्ट्यांचे वितरण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील काॅंग्रेस पक्षाचे गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत ह्या सर्व लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले होते. मात्र सदर घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी लाभार्थ्यांच्या नावाने जागा नसल्याने ह्या लाभार्थ्यांना घर कुठे बांधायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा आमदार विजय वडेट्टीवार यांनी याबाबत पाठपुरावा करून लाभार्थ्यांना जमीनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी श्रीहरी देवगडे, अविनाश सहारे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here