जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा- भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत तुमसर पंचायत समितीच्या वतीने शिवछत्रपती प्राथमिक शाळा तुमसर येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन सोमवार दि.3 मार्च 2025 ला करण्यात आले.
तुमसर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश साठवणे यांच्या अध्यक्षतेखाली विस्तार अधिकारी अर्चना माटे, केंद्रप्रमुख एस.आर. शाहू, एन. टी.सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा घेण्यात आली.ह्याप्रसंगी शापोआ डेटा एन्ट्री ऑपरेटर शुभांगी तुनेश बुधे, विशेष शिक्षक प्रमोद रहांगडाले, आयसीडी लॅब तंत्रस्नेही विजया गायधने, शिव छत्रपती प्राथमिक शाळा तुमसर शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा समरीत, शाळेतील शिक्षक ढोणे प्रामुख्याने उपस्थीत होते .
या तालुकास्तरीय पाककृती स्पर्धांमध्ये तालुका स्तर पाककृती स्पर्धा विजेते पद नपरथम क्रमांक न. प . मालवीय प्राथमिक शाळा तुमसर द्वितीय क्रमांक न. प. गांधी प्राथमिक शाळा तुमसर तर तृतीय क्रमांक जि. प. प्राथमिक शाळा मिटेवाणी आदी शाळांनी विजेते क्रमांक पटकावले.
तालुकास्तरीय पाक कृती स्पर्धेत स्वयंपाकी व मदतनीस यांनी सहभाग घेतला. आपले कौशल्य वापरून विविध प्रकारच्या पाककृती तयार करून सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन श्री.ढोणे सर यांनी केले. मंचावरील पाहुणे यांनी स्पर्धकांना शाळेत मिळणाऱ्या पोषण आहाराचे विद्यार्थ्यांच्या जीवनात असणारे महत्व यावर मार्गदर्शन केले. सर्व विजेत्या शाळांचे कौतुक पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. सहभागी होणाऱ्या स्वयंपाकी, मदतनीस यांना सुद्धा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार फुंड यांनी मानले.

