सुविद्या बांबोडे विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर – चंद्रपूर विभागात कॅन्सरचे रोगी जलद गतीने वाढत आहेत आणि त्यांच्या पैकी बऱ्याच लोकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. ह्या अनुषंगाने कॅन्सरच्या बाबतीत लोकांमध्ये जागृती वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्याने 9 मार्च 2025 ला चंद्रपूर बचाव संघर्ष समिती आणि चंद्रपूर शहर महानगरपालिका द्वारा संयुक्त विद्यमाने चंद्रपूर शहरात मिनी मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तीन समूहामध्ये आयोजित करण्यात येत आहे. विजयी स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येईल.
चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम चालत येत असतात ज्यामध्ये प्रामुख्याने प्रदूषण, यातायात समस्यांचे समाधान, ऐतिहासिक स्मारकांचे जतन, वृक्षारोपण इत्यादींचा समावेश आहे. एवढ्यात बेटी पढाव बेटी बचाव चा उपक्रम विभिन्न शाळा आणि कॉलेज मधून घेण्यात आलेला आहे. सामाजिक समस्यांच्या उपायांसाठी अग्रणी असलेली चंद्रपूर बचाव संघर्ष समिती च्या विद्यमाने कॅन्सरच्या संदर्भात जागरूकता वाढवण्यासाठी चंद्रपूर शहरात मिनी मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आलेले आहे. मॅरेथॉन 9.3.25 सकाळी साडेसहा वाजता गांधी चौक पासून सुरू होईल आणि जेटपुरा गेट ला पोहोचल्यानंतर परत गांधी चौक मध्ये येऊन समाप्त केल्या जाईल. ह्या मॅरेथॉनमध्ये 18 वर्ष, 19 ते 50 वर्ष तसेच 51 च्या पेक्षा अधिक वयोगटातील महिला आणि पुरुष यांचे तीन वेगवेगळे गट असतील. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पंजीकरण करण्यात आलेल्या 400 स्पर्धकांना आकर्षक टी-शर्ट आणि प्रमाणपत्र दिल्या जाईल. नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना खूप मोठ्या संख्येने ह्या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, महासचिव मधुसूदन रुंगटा व अन्य अधिकारी यांनी आवाहन केलेले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. गोपाल मुंधडा यांना संपर्क करू शकता.

