समारोपीय कार्यक्रमाला माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांची विशेष उपस्थिती
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
ब्रम्हपूरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथे ज्ञानदान श्रीमद हरिनाम भागवत सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम दिनांक ०७/०३/२०२५ रोज शुक्रवार झाला. ०१ तारखेपासून तळोधी खुर्द गाववासीय जनता तळोधी खुर्द यांच्या सौजन्याने या ज्ञानदान श्रीमद हरिनाम भागवत सप्ताहाला सुरुवात झाली होती. मागील सात दिवसांपासून तळोधी खुर्द येथील राजीव गांधी सभामंच आवारात तळोधी खुर्द .भंडारा जिल्ह्यातील सानगडी येथील ह.भ.प.केशरताई मेश्राम महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतुन गावातील नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.
भागवत सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी विशेष अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर हे उपस्थित होते.तर सत्कारमूर्ती .डॉ.नामदेवराव किरसान साहेब खासदार गडचिरोली -चिमुर लोकसभा क्षेत्र,प्रमुख अतिथी म्हणून.प्रभाकरजी सेलोकर कृ.उ.बा.स.ब्रम्हपुरी,खेमराज तिडके कॉं.क.ता.अध्यक्ष,ईश्वर ठाकरे मा.सरपंच,अनिल तिजारे सरपंच,प्रमोद मोटघरे संचालक कृ.उ.बा.स,किशोर राऊत कृ.उ.बा.स,,गोनशेट्टीवार महाराज, यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

