आशियाई स्पर्धेत भंडाराच्या प्राचीने रचला इतिहास

0
81

आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताला मिळवून दिले सुवर्णपदक

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा- तालुक्यातील खमारी बुट्टी या ग्रामीण भागातील प्राची ला आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात भारतीय टीमची कर्णधार म्हणून खेळणे ही माझ्यासाठी अतिशय गौरवाची बाब आहे. नशिबाने ही संधी मिळाली. आणि मिळालेल्या संधीचे सोने करणे गरजे होते. म्हणून संघात समावेश असलेल्या खेळाडूंचा विश्वास संपादन केला. टीमच्या व माझ्या कुशल नेतृत्वाने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

प्राची ने उंचावली जिल्ह्याची मान

भंडारा तालुका व जिल्ह्यातील खमारी (बुट्टी) गावातील भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार हीने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. प्राची चटप ने कठोर परिश्रम आणि क्रीडा क्षेत्रातील अद्वितीय कामगिरीमुळे जिल्हा, महाराष्ट्राबरोबरच भारताचा गौरव वाढविला आहे.

खमारी (बुट्टी) हे जिल्ह्यातील २ हजार ३४४ लोकसंख्येचे खेडेगाव. अत्यंत गरिब, भुमीहीन कुटुंबात जन्मलेल्या प्राचीने अनेकदा परिस्थितीशी दोन हात केले. प्राची तीन वर्षांची असतांना वडील केशव चटप यांचे अपघाती निधन झाले. आई दुर्गा चटप यांनी आपल्या मुलीला -मुलांप्रमाणे प्रोत्साहन दिले व मुलीच्या क्रीडातील करिअरसाठी मेहनत घेतली. क्रीडा प्रशिक्षक श्याम देशमुख यांच्या मार्गदर्शनात प्रारंभीचा सराव दसरा मैदानावर झाला. त्यानंतर लार्ड पब्लिक स्कूल (मेंढा) भंडारा येथे क्रीडा प्रशिक्षण सुरु आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही ठसा

राष्ट्रीय नाही, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्येही अनेकदा प्राची ने महाराष्ट्राबरोबर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. भुटान येथे ८ व्या दक्षिण आशियाई आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाची कर्णधार होऊन भारतासाठी स्वर्णपदक मिळवून दिले आहे. प्राची चे यश फक्त तिचे नाही, तर गाव व जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. तिच्या प्रेरणेने गावाबरोबर अनेक मुलींनी क्रीडा क्षेत्रात आपले करिअर घडवण्याचे स्वप्न पाहिले आहे.

*भुटान येथील ऐतिहासिक कामगिरी*

भारतीय आट्यापाट्या असोसिएशन व दक्षिण आशियाई फेडरेशन भुटान च्या वतीने भुटान येथे झालेल्या ८ व्या दक्षिण आशियाई आट्यापाट्या चॅम्पियनशिप २०२३-२०२४ (आंतरराष्ट्रीय) महिला सीनिअर स्पर्धेत भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार व ज्यांच्या मुळे यायला मिळाले त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. यापुर्वी प्राची तीन वर्ष महाराष्ट्राची कर्णधार होती. तिने टीम करिता अनेक पदकांची कमाई केली आहे.

आईचे स्वप्न साकारले

आई दुर्गा केशव चटप ही नेहमी माझी मुलगी प्राची माझा सन्मान महाराष्ट्रात वाढवेल असे नेहमी सांगायची व प्राची ने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राबरोबर भारताचे नाव लौकिक केले आहे. भारताची कर्णधार व स्वर्णपदक प्राप्त केले आहे. अन् तिच्या आईचे स्वप्न आपल्या मुलीने खरे केले आहे हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here