2.0 (PoCRA) यांच्यात ३ मार्च २०२५ रोजी सामंजस्य करार (MoU)
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत भारत ग्रामीण उपजीविका फाउंडेशन व मनरेगा यांच्या परस्पर सहकार्याने राज्यातील नांदेड, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर,व यवतमाळ अश्या एकूण 5 जिल्ह्यामध्ये High Impact Mega Watershed प्रकल्प सुरू असून प्रकल्पाला आर्थिक सहाय्य अक्सिस बँक फाउंडेशन करण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत एकूण 26 तालुक्याचा समावेश असून 10 CSO संस्था समाविष्ठ आहे. 3 मार्च 2025 रोजी, महाराष्ट्र राज्यातील कृषी विभाग अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 (PoCRA) आणि भारत रूरल लाव्हलिहुड फाउंडेशन (BRLF) यांच्यात शाश्वत ग्रामीण विकास, उपजीविका सुधारणा आणि कृषी पद्धतींच्या विस्तारासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प चे मा. प्रकल्प संचालक परिमल सिंग सर व भारत रूरल लाव्हलिहुड फौंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा कुलदीप सिंग सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. *या करारा अंतर्गत 5 जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायत मधील 355 गावाचा समाविष्ठ करण्यात आलेले आहे.* कराराचे उद्दिष्ट म्हणजे मॉडेल गावे विकसित करणे, ज्या ठिकाणी शाश्वत कृषी पद्धतींचा वापर केला जाईल आणि ग्रामीण समुदायांच्या जीवनमानात सुधारणा होईल.हा करार शाश्वत ग्रामीण विकासाला चालना देणे, उपजीविका सुधारणे आणि राज्यात कृषी पद्धती वाढवणे या उद्देशाने मॉडेल गावे विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या
महत्त्वपूर्ण सहकार्याचे प्रतिनिधित्व करण्यात येणार आहे.या कराराच्या माध्यमातून, दोन्ही संस्था एकत्र येऊन ग्रामीण भागात कृषी क्षेत्रातील विविध समस्यांवर उपाय शोधतील. पिकांच्या उत्पादनात वाढ, जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापन, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा यावर काम केले जाईल. यासोबतच, यामध्ये स्थानिक समुदायांची क्षमता निर्माण करण्यावरही भर दिला जाईल, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल आणि स्थानिक शेतकऱ्यांची उपजीविका स्थिर होईल.
मॉडेल गावे विकसित करण्यासाठी या सहकार्याचा उपयोग कृषी उत्पादनाच्या दर्जात वाढ आणि कृषी व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञानांचा उपयोग करण्यासाठी केला जाईल. तसेच, वातावरणीय बदलावांवर टिकाऊ उपाय आणि सेंद्रिय शेतीच्या पद्धतींच्या वापराला प्रोत्साहन दिले जाईल.या करारामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळणार असून, शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जाईल. या सहकार्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल, आणि त्यांना एक सशक्त, आत्मनिर्भर भवितव्य मिळवता येईल.त्यावेळी उपस्थित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प चे मा. प्रकल्प संचालक परिमल सिंग सर व भारत ग्रामीण उपजीविका फौंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा कुलदीप सिंग सर उपस्थित होते.

