भगिनींचा हिरकणी पुरस्काराने सन्मान
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड नागपूर आणि थिऑसाॅफीकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व सावित्रीआई फुले स्मृतिदिनानिमित्त स्त्रीशक्तीचा मेळावा स्मृती सभागृह, जुना सुभेदार शारदा चोक येथे आयोजित करण्यात आला.
अ.भा.सावित्री ब्रिगेड व थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. स्मिता निशिकांत मेहेत्रे आपल्या प्रास्ताविकात म्हणाल्या, “विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या भगिनींचे कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता त्यांना आमच्या संस्थेच्या वतीने हिरकणी पुरस्काराने गौरविण्यात येते.या वर्षी २०२५ मध्ये आलेल्या १६० प्रस्तावातून कर्तृत्ववान, प्रतिभावंत भगिनीतून २१ हिरकणींची निवड करण्यात आली . पुढे त्या म्हणाल्या,या हिरकणींनी राष्ट्रहितासाठी झटावे.” या कार्यक्रमाचे उद् घाटन माजी महापौर डॉ.कल्पनाताई पांडे यांनी केले.
हिरकणी पुरस्कारात ललिता पुराणिक पहिली महिला प्रकाशिका नागपूर , शुभांगी भडभडे संस्थापक, पद्मगंधा प्रकाशन ,अश्विनी जिभकाटे विशेष विज्ञान शिक्षिका ,प्रा.डॉ.प्रेमा लेकरूवाळे रेणुका काॅलेज नागपूर ,लीना बाकरे संचालिका आस्था अकॅडमी ,सुनंदा वाघमारे सामाजिक कार्यकर्ता ,सरिता जयपुरकर जिल्हा परिषद शिक्षिका हिंगणा , डॉ. श्रद्धा बेले होमिओपॅथिक डॉक्टर ,वैशाली मुन प्रकाशिका साई प्रकाशन चंद्रपूर,सरोज अंदनकर संस्थापक बालाजी सरोज भावकाव्य साहित्य प्रतिष्ठान , मालती वराडे संस्थापिका खुशबू कल्चरल ॲकॅडमी ,डॉ ऋतुजा रतकंठीवार त्वचारोग तज्ज्ञ, प्रा.सरिता बुटले फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली,वैशाली ठाकरे वरिष्ठ लिपिक निर्मल उज्वल को-ऑपरेटिव ,हर्षा डहाके शिक्षिका जिजामाता सबाने उ.प्रा.शाळा म्हसाळा वर्धा,प्रीती हिवरकर ,लिपिक व्याघ्र प्रकल्प आदींना हिरकणी मोमेंटो,शाॅल, प्रमाणपत्र,रोपटे, ग्रंथ व दीप देऊन गौरविण्यात आले.
सर्व अतिथींना “स्री – शक्ती पुरस्कार मोमेंटो, डॉ.स्मिता मेहेत्रे लिखित सावित्रीआई फुले , निशिगंध पुस्तके, शाॅल,रोपटे ,दीप देऊन सन्मानित करण्यात आले.अध्यक्षस्थानी असलेल्या इरा इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका अनिताताई पांडव म्हणाल्या,” स्त्रियांनी प्रत्येक समस्येला सामोरे जावे व आपली वाटचाल करावी. “अतिथीस्थानी असलेल्या ओबीसी महिला महासंघाच्या अध्यक्षा वृंदाताई ठाकरे यांनी अतिशय सुंदर सोहळा संपन्न होतोय ,अशा कार्यक्रममाची आज समाजाला गरज आहे असे प्रतिपादन केले.” सामाजिक विचारवंत सरीताताई राणेकर, श्रद्धा वझरकर यांनी भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
शितल बनसोड, उज्वला पाटील समुहाद्वारे महानायिकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत दुर्वा खोडस्कर, मोर्शी अमरावती हिने सर्वोत्कृष्ट क्रमांक,क्षमा माळवे प्रथम क्रमांक, डॉ ऋतुजा गोमासे द्वितीय क्रमांक ,पूजा वैरागडे तृतीय क्रमांक, सरिता जयपुरकर बालकांचे शोषण , जयश्री धात्रक, उर्मिला या एकपात्री प्रयोगांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले .यात पद्मजा बनसोड,शैलेशा भूरे,सुनंदा जांबूतकर, नंदा सोनुले ग्रुप आदींच्या नृत्याने सभागृह भारावून गेले .सहभागी सर्व स्पर्धकांना बक्षीस वितरीत करण्यात आले हेही विशेषच! कार्यक्रमाचे सुरेख संचलन प्रणोती कळमकर तसेच स्वागत गीत संजीवनी हलमारे, माधुरी पाटील यांनी सादर केले .आभार रेखा हिरुडकर , सांस्कृतिक स्पर्धेचे संचलन निमा बोडखे यांनी केले. ॲड. रोमा खंडवानी, विद्या सुरकार ,संगीता लंगडे , डॉ.नयना गुरनुले, नम्रता देशमुख,लता कनेर, जयश्री भाजीपाले, जयश्री मोहितकर,विणा बिंड,ज्योती मुन, राणी शहा ,डॉ. शील बागडे, मनीषा जळीत ,मीनल रेवतकर ,मनीषा बाविस्कर ,वंदना क्षिरसागर ,छाया महाले, शोभा येवले, रुपाली जिचकार आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले . महाराष्ट्रातून ६०० भगिनींची उपस्थिती असलेल्या या दिमाखदार सोहळ्याची सांगता स्नेह भोजनाने झाली.

