विकलांग सेवा संस्थेचा विधायक उपक्रम
स्वाती मेश्राम जिल्हा उपसंपादक चंद्रपूर – चंद्रपूर: 8 मार्च हा जागतिक महिला दिवस जगभर सर्वत्र साजरा करण्यात आला. या महिला दिनानिमित्याने समाजातील कष्टकरी व विधायक, कर्तबगार महिलाचा सस्नेह सन्मान कार्यक्रम नुकताच विकलांग सेवा संस्था प्रशिक्षण केंद्र येथे संपन्न झाला.या कार्यक्रमात शिक्षिका देवतळे यांचा सत्कार तसेच गरीब कष्टकरी महिलांनाही शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच उपस्थित महिलांना सॅनिटरी नेपकिन व गृहपयोगी साहित्य देण्यात आले.
या कार्यक्रमाला आर्थिक सहकार्याकरिता नितीन राव यांनी सहयोग दिला.या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी श्रीराम पान्हेरकर,देवराव कोंडेकर, देवतळे,नंदा बिहाडे,पुष्पा बेशेट्टीवार व्यसनमुक्ती प्रचारक तुकुम, पूजा चहारे,राजश्री शिंदे,सुनंदा पान्हेरकर,सीमा दुपारे यांची उपस्थिती होती

