तालुका प्रतिनिधी अहेरी
विवेक मिरालवार
8830554583
अहेरी: रंगपंचमीनंतर प्राणहिता नदीवर अंघोळीकरीता गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुखद घटना १४ मार्च रोजी दुपारच्या सुमारास महाराष्ट्र-तेलंगाणा राज्याच्या सीमेवर घडली. कामपल्ला राजकुमार (२०) रा. वेमनापल्ली जि. मंचेरीयाल (तेलंगाणा) असे त्या तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार सिरोंचा तालुक्यातील मोयाबीनपेठा जवळील प्राणहिता नदीच्या पलीकडील तेलंगाणा राज्यातील वेमनापल्ली येथील कामपल्ली राजकुमार हा तरुण आपल्या मित्रांसोबत रंगपंचमीनंतर नदी पत्रात अंघोळीकरिता आला होता. त्या ठिकाणी पाणी खोल तसेच पाण्यात गाळ असल्याने व त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे होली निमित्ता विशेष कविता – होळी आली होळी
या घटनेची माहिती मिळताच मासेमारी करणाऱ्या नागरिकांनी धाव घेत बोटीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढले. तेलंगाणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतली. याबाबत रेगुंठाचे प्रभारी अधिकारी कृष्णा काटे यांच्याकडून अधिक माहिती घेतली असता त्यांनी सदर घटना तेलंगाणा हद्दीत घडल्याचे सांगितले.
सर्वत्र रंगपंचमीचा उत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर दुःखद घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. कामपल्ला राजकुमार हा तरुण पदवीची अंतिम वर्षाची शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.

