होळी आली होळी
आले मांगल्याचे क्षण
रंगात रंगून साऱ्या
झाले आनंदी मन।।१।।
होळीचा सणाला
जाळु दुर्गुण सारे
रंग एकच प्रेमाचा
उंच आभाळी फेका रे।।२।।
मानव सारेच समान
रंगच बोलून जातात
उंच फेकता आभाळी
सर्व रंग एकच होतात।।३।।
निळा जांभळा आकाशी
चैतन्य देत असे मनाला
रंगीबेरंगी जीवन आपले
सांगत राही प्रत्येक क्षणाला।।४।।
अशी होळी सूंदर
निराशेचे करू दहन
आनंदाने फुलून येईल
नक्की आपले अंगण।।५।।
होळी आली होळी
भर सद्गुणांची झोळी
होळीचा सणाला करू
मस्त पुरणाची पोळी।।६।।
पूजा करू होळीची
निराशा दुःख दुर करू
मानव सारे सामन असती
माणुसकीची कास धरू।।७।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

