भारत धर्मनिरपेक्ष देश
नांदती सारे गुण्यागोविंदाने
ज्वलन लाकडाचे थांबवून
सण साजरा करू उत्साहाने…
निसर्गाचे संवर्धन करू
निगा राखू आपण त्यांची
झाडे लावा झाडे जगवा
करू पूजा अग्निदेवतेची …
सण रंगाचा आपुलकीचा
कायम ठेवू सारेच जिव्हाळा
विसरू आपसातील मतभेद
साऱ्यांना लागे एकच लळा…
सण असे भारतीयांचा
दिली त्यांनीच पुरणपोळी
साजरा करी बळीराजा
सारेच साजरी करू होळी..
निसर्ग आपुला अनेक रंगी
रंगात रंग पळस फुलाचा
गुलाल उधळू शांतीचा
रंग प्रेमाचा गंध स्नेहाचा…
आली होळी रंग रंगाची
दाखवू नैवद्य पुरणपोळीचा
मनामनात देऊ तिला बहरू
करू सण साजरा रंगपंचमीचा…
प्रा.नानाजी रामटेके
आरमोरी,जिल्हा गडचिरोली

