होळी आली होळी
करू रंगाची उधळण
प्रेमाचा संदेश देऊनी
प्रफुल्लीत ठेवू मन.
रागाला प्रेमाने जिंकू
एकमेका लावूया रंग
करूया सण साजरा
उत्साहात होऊनी दंग.
आळसावर करुया मात
बाजूला ठेवू जात-पात
मरगळ सारी दूर सारून
पेटवूया दिव्यांची वात.
वाईट विचारांची
आज होळी पेटवू
बंधुत्वाची शिकवण
पुढच्या लेकरांना देऊ.
दिपककुमार सरदार
शिक्षक कॉलनी किनगावजट्टू
तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

