होळी पेटली अंगणी
दुष्ट प्रवृत्ती जाळाया
सत्कर्माची जिकुं बाजू
सुख समाधान लाभाया…
होळीची ज्वाला पेटून
वाईट सगळं जळू दे
सत्य प्रेम सदभावना
नव्या उमेदीने फुलू दे…
पुरणपोळीचा सुगंध
गोडवा भरवी मनात
होळीच्या या सणाने
जल्लोष होई जनात…
गोड गोड पुरणपोळी
तोंड गोड करुनी घेऊया
आनंदाच्या या क्षणीच
स्नेहबंध नव्याने जुळवूया
होळीच्या ज्वालानी
स्नेहभाव दीप उजळे
तापट मन शांत होऊन
विचारांना प्रेरणा मिळे…
संध्या रायठक/ धुतडे
शिक्षिका, नांदेड

