मराठी महिन्यातील सण
होळी सण शेवटचा
धुलीवंदनाला रंगुन जाऊ
करु नाश अहंकाराचा
होळीमध्ये दहन करु
राग लोभ मत्सराचे
रंग लाऊन एकमेकांना
विरजण घालु प्रेमाचे
सुकी लाकडे आणि गोव-या
गवतानी रचु होळी
तिच्याभोवती काढु
रंगीबेरंगी रांगोळी
ओली लाकडे तोडुन
नको जंगलाचा -हास
तेच देतील ऑक्सिजन
वाचवतील आपल्या प्राणास.
वनसंपत्तीमुळे पडतो पाऊस
म्हणून मिळते पाणी
झाडे लावु झाडे जगवु
हाच संकल्प करु होळीच्या दिनी…
सौ. सुनंदा वाळुंज ठाणे

