prabodhini news logo
Home चंद्रपूर नीट परीक्षा पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

नीट परीक्षा पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

0
89

रोहिणी खोब्रागडे सहसंपादिका प्रबोधिनी न्युज – दि. 17 मार्च : नॅशनल एलिजिबिलिटी कम इंटरन्स टेस्ट अर्थात नीट परीक्षेच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी सोमवारी संबंधित यंत्रणेचा आढावा घेऊन सूचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य तथा नीट परीक्षा जिल्हा समन्वयक अनिल घोलपे, शिक्षण अधिकारी कार्यालयाचे श्री. येळणे तसेच पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यात 4 मे 2025 रोजी 12 परीक्षा केंद्रावर नीट परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्र असलेल्या सर्व परिसराची तसेच तेथे पुरविण्यात येणा-या सर्व सोयीसुविधांची पाहणी करावी. परीक्षा कालावधीत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी सुरक्षेसह इतर अनुषंगीक बाबींची पुर्तता करावी, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 5124 विद्यार्थी नीटच्या परिक्षेला बसले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here