मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

0
72

प्रशांत देशपांडे ब्युरो चीफ प्रबोधिनी न्युज नेटवर्क 8855997015 – राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज राजभवन, मुंबई येथे ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड्स 2025’ कार्यक्रम संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमामध्ये राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘लोकमत’ माझ्यासाठी परिवार असून आपल्या घरातूनच शाबासकी मिळाल्याचे मी समजतो. या पुरस्कारासाठी ‘लोकमत’चे मनापासून आभार. कोणताही पुरस्कार मिळाला तर त्यातून निश्चितपणे अधिक चांगले काम केले पाहिजे. या पुरस्काराला अनुरुप असेच कार्य भविष्यात होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांची या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुलाखत घेतली. तसेच ‘लोकमत’ माध्यम समुहाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, ‘लोकमत’ माध्यम समुहाचे अध्यक्ष विजय दर्डा, ‘लोकमत’ माध्यम समुहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here