परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील एक अग्रगण्य आणि प्रतिष्ठित विधीज्ञ सेलू येथील ऍड. विष्णू ढोले यांना प्रशासनाने परभणी जिल्ह्यातून नुकतेच हद्दपार केले आहे ही हद्दपारी राजकीय हेतूने केलेली असून ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी परभणी जिल्ह्यातील सर्व आंबेडकरवादी पक्ष आणि संघटना यांच्या वतीने विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
ऍड.विष्णू ढोले हे परभणी जिल्ह्यातील प्रतिष्ठित वकील म्हणून सर्व परिचित आहेत त्यांच्याकडे आज रोजी 600 पेक्षा जास्त कोर्ट केसेस आहेत, विविध सामाजिक क्षेत्रामध्ये ते सक्रिय असतात, हृद्यपारीचा प्रस्ताव दाखल झाला त्यावेळेस त्यांच्यावर एकूण आठ गुन्ह्यांची नोंद होती परंतु प्रस्ताव मंजूर होईपर्यंत त्यापैकी तीन गुन्हे यामध्ये ते निर्दोष सिद्ध झाले आहेत म्हणून त्यांची हद्दपारी रद्द करावी तसेच त्यांच्यावर दाखल असलेले सर्व गुन्हे हे सामाजिक चळवळीतील असल्यामुळे समाजासाठी लढणारा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ऍड. विष्णू ढोले यांची जिल्ह्यात ओळख आहे या सामाजिक गुन्हा मुळे त्यांची झालेली हद्दपारी रद्द करावी अन्यथा आंबेडकरी चळवळीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.. निवेदनावर भीमशक्तीचे सुहास पंडित, प्रा.डॉ. प्रवीण कनकुटे, भीम आर्मी चे कचरू गोडबोले, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष सतीश भिसे, नितीन सावंत, इंजिनिअर सुरेश फड, आर.पी.आय चे भूषण मोरे, धम्म मैत्री अभियानचे संजय बगाटे, सम्यक चे लखन सौंदरमन, वंचितचे सर्जेराव पंडित, विक्रम काळे, दीपक कनकुटे, अनिल सूर्यवंशी अरुण गायकवाड, अंकुश वानखेडे, यश वायवळ, किशोर धबडगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

