मूल प्रशासनाच्या कार्याची दखल राज्य शासनाने घ्यावी व राज्यस्तरावर यांची अंमलबजावणी करावी – दीपक देशपांडे.
मूल प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – एक अत्यंत महत्वाचा आणि बळीराजाला ,ग्राहक राजाला शेतकऱ्यांना लाभदायक अशा कार्यक्रमांचे आयोजन आणि त्यानिमित्ताने ग्राहक जागृतीची जोड देणारा मूल तहसील प्रशासनाने आयोजित केलेला हा कार्यक्रम संपूर्ण चंद्रपूर जिल्हाच नव्हेतर महाराष्ट्र राज्यासाठी सुद्धा एक आदर्श पायंडा ठरावा आणि म्हणूनच असे आयोजन केल्याची दखल महाराष्ट्र राज्यातील ग्राहक आणि ग्राहक चळवळीत सहभागी होणाऱ्या संघटनांनी घ्यावी आणि प्रशासकीय अधिकारी यांचेशी संपर्क करुन अशा आयोजनाची मागणी करावी असा स्तुत्य उपक्रम राबविण्याचा प्रयत्न तहसील कार्यालय मूल तर्फे करण्यात आला आहे याची निश्चितच नोंद झाली पाहिजे आणि हा आदर्श इतरत्र स्विकारला जावा म्हणूनच आम्ही मूल तालुका प्रशासनाचे गर्वाने अभिनंदन करतो,आणि प्रशंसा करतो कारण एकीकडे ग्राहक दिनाचे कार्यक्रम आयोजित करताना बहुतेक ठिकाणी केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ते आयोजित करण्यात येतात तर मूल तालुक्याने ग्राहक राजाला त्याच्या अडलेल्या अडणाऱ्या कामांची पूर्तता करण्यासाठी या संधीचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा आयोजनाचा उद्देश ठेवून ते सफल केले जाऊ शकतात हे सोदाहरण स्पष्ट केले आहे परिणामी राज्यशासनाने यांची दखल घेऊन असे कार्यक्रम राज्यभर राबवावेत अशी प्रतिक्रिया प्रमुख अतिथी म्हणून बोलताना दीपक देशपांडे, अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत यांनी या कार्यक्रमात व्यासपीठावरुन बोलताना दिली.
आपल्या वक्तव्यात दीपक देशपांडे पुढे म्हणतात , ग्राहक कुणाला म्हणायचे , आणि त्यांचे अधिकार काय व या ग्राहक राजाची फसवणूक कशी होते इथपासून तर फसवणुकीच्या प्रकाराबाबत मार्गदर्शन करताना ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव करून घेण्याची आवश्यकता कशी आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आणि जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली
कोणत्याही वस्तूची खरेदी करताना पावती मागायची सवय लावा तीच आपल्यासाठी भविष्यात महत्वाचा पुरावा म्हणून उपयोगी पडणार आहे,ही बाब आपल्या कुटुंबाला आणि मित्रपरिवार व गावातील जनतेला माहिती करून द्या, आमच्या जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या पदाधिकारी यांचेशी संपर्क साधा आणि फसवणूक टाळण्यासाठी ते तुमच्या मदतीला धावून येतीलच एकमेकांना सहकार्य करु आणि शोषणमुक्त समाज घडविण्यासाठी प्रयत्न करु अशी अपेक्षा दीपक देशपांडे यांनी व्यक्त केली. फसवणूक छोट्या स्वरूपात असो की मोठ्या त्याविरुद्ध आवाज उठवा आपल्या हक्कासाठी लढा द्या,हेच सांगण्यासाठी आम्ही इतक्या रणरणत्या उन्हात तुमच्या पर्यंत पोहोचलो तर आम्हाला यासाठी मोठी रक्कम मिळते किंवा पगार मिळतो म्हणून नाही तर एक सामाजिक उपक्रम म्हणून आमच्याच खिशातले पैसे खर्च करून आम्ही तुमच्यासोबत संवाद साधून तुम्हाला सचेत करण्यासाठी इथपर्यंत आलो आहोत , त्यामुळे आपली फसवणूक टाळण्यासाठी कुठे अडचण आली किंवा फसवणूक झाली आहे,होत आहे अशी शंका आली तरी आमच्याशी संपर्क साधून तक्रार करायला पुढे येण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली. काही प्रमाणात अधिकाऱ्यांची उदासीनता अनेक शासकीय योजना सर्वसाधारण लाभार्थ्यांना माहितीच होऊ नये असा प्रयत्न केला जातो हे खरे आहे मात्र आपल्या सहकार्याने आणि आपण प्रश्न विचारण्याची सवयच लावली की त्यांचे उत्तर शोधणे सोपे होते असा आमचा अनुभव आहे त्यामुळे आपल्या शंकांचे निरसन करून घेण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे , यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तेव्हा त्यात सहभागी झाले पाहिजे यांतून आपल्याला काय मिळवता येईल याचा विचार केला पाहिजे तरच अशा कार्यक्रमांचे आयोजनाचा उद्देश सफल होईल असेही दीपक देशपांडे यांनी स्पष्ट केले.
तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलताना, ॲग्री स्टॅक ही शेतीशी संबंधित सर्व घटकांना शेतकरी, ग्राहक, विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणणारी एक क्रांतिकारक प्रणाली आहे. यामधून शेतकऱ्याची ओळख (फार्मर आयडी) निश्चित केली जाते आणि शेतीच्या सर्व प्रक्रियांमध्ये अचूकता आणि पारदर्शकता आणली जाते,असे प्रतिपादन मृदुला मोरे तहसिलदार यांनी केले आणि शेतकरी मार्गदर्शन व जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना फार्मरआयडी काढण्याचे व इतर योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
नायब तहसिलदार ओंकार ठाकरे यांनी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार लिंक करून घ्यावे ,कारणआता शासकीय योजना लाभार्थ्यांना डिबीटी योजनेअंतर्गत सरळ खात्यात पैसे येणार असल्याने आधार ला बॅंक खाते संलग्न करण्यात यावे , अथवा जे खाते आधारशी संलग्नित आहे त्याच खात्यात पैसे जमा केले जात आहेत त्यामुळे आपले कोणते खाते आधार संलग्नित आहे याची शहानिशा करून घ्यावी असे व्यासपिठावरून बोलताना स्पष्ट केले.
सरपंच,रविंद्र कामडी यांनी आयोजनाचा उद्देश स्पष्ट करीत गावकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न आणि ग्राहक म्हणून असलेल्या आपल्या अधिकारांची माहिती दिल्याबद्दल जागृत ग्राहक राजा या सामाजिक संघटनेच्या कार्याचा गौरव करीत अभिनंदन केले व ग्रामस्थ याबाबत नेहमीच सकारात्मक राहतील अशी ग्वाही दिली आणि आम्ही अशा आयोजनाचे स्वागतच करू असे आश्वासन दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका हा प्रशासकीय निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अग्रेसर असून तालुक्यातील वेगवेगळ्या गावात राष्ट्रीय ग्राहक दिन व जागतिक ग्राहक हक्क दिन१५मार्च निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करीत जनजागृती करण्यासाठी दीपक देशपांडे यांचे नेतृत्वात नेहमी पाठपुरावा करून प्रशासनाला हे कार्यक्रम जनतेच्या दरबारातच साजरे करण्याची आवश्यकता पटवून देत हे दोन्ही दिवस गावपातळीवर साजरे केले जातात.यामुळे प्रशासकीय यंत्रणेला त्यांच्या योजना आणि ग्राहकांना त्यांच्या हक्कांची व अधिकारांची जाणीव करून देत जनजागृती करण्याचे कार्य सहजसुलभ पद्धतीने पार पाडले जात आहे.
यावर्षी मूल तालुका प्रशासनाने कोसंबी या गावात या कार्यक्रमाचे आयोजन केले, या कार्यक्रमात तहसीलदार मृदूला मोरे या अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा, नागपूर विदर्भ प्रांत , डॉ आनंदराव कुळे, सदस्य, जागृत ग्राहक राजा,नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, कोसंबी चे सरपंच रवींद्र कामडी, पुरवठा निरीक्षक मूल राजेश शिरभाते, गृहपाल आदिवासी मुलांचे शास. वस्तीगृह मूल प्रशांत फरकाडे, प्रसन्ना (उमेद उपक्रम) आदी मान्यवर उपस्थित होते.
नुकतेच शुक्रवार रोजी एक आदर्श गाव मौजा – कोसंबी येथे तहसिल कार्यालय मूल च्या वतीने मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या १०० दिवसांच्या सात कलमी कार्यक्रम व जागतिक ग्राहक दिन बाबत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या वतीने पि. एम. जनमन/ उन्नत ग्राम अभियान अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले याच निमित्ताने ग्रामस्थांना ग्राहक हक्क व फसवणूक प्रकारांची माहिती करुन देण्यासाठी जागतिक ग्राहक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश गांडलेवार (ग्राम महसूल अधिकारी विहीरगावं) यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता राजेंद्र नन्नावरे (मंडळ अधिकारी मूल), बुध्दराज फुलझेले (ग्रा. म. अधि. कोसंबी), महेश कडवलवार (ग्रा. म. अधि. मूल), प्रशांत वडस्कर (ग्रा. म. अधि. चिचाळा) व प्राची चौखे (ग्रा. म. अधि. ताडाळा) इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.
सदर विशेष शिबिरामध्ये खालीलप्रमाणे नागरिकांना योजनेचा लाभ देण्यात आले.
अग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आय. डी. चे वाटप खालील शेतकऱ्यांना करण्यात आले
१. पत्रू डोमाजी चौधरी
२. भागरताबाई यशवंत पेंदाम
३. शांताबाई बाबुराव भोयर
४. भागरथाबाई गंगाराम उराडे
५. गुरूदास गिरडकर
अधिवास व जात प्रमाणपत्र
१. गौरव धनराज सिडाम
२. निकेश मारोती चौधरी
शिधा पत्रिका वाटप
१. प्रेमिका रमेश मोहूर्ले
२. नूतन सियोग मोहुर्ले
३. लता अरूण शेंडे
४.राघोजी मन्साराम शेंडे
५. बजाबाई बापूजी जेंगठे
६. सुभाष आत्माराम गुरनुले
७/१२ अभिलेखाचे मोफत वाटप
१. मनोज महादेव ठाकरे गावं -चिचोली
२. अल्का मोहन किन्नाके गावं – चक काटवन
३. प्रकाश बुधाजी चौधरी गावं – कोसंबी
४. ईश्वर बापूजी चौधरी गावं – कोसंबी
याव्यतिरिक्त इतर योजनांची माहिती व आरोग्य विषयक माहिती व तपासणी यानिमित्ताने करण्यात आली.

