माजी खासदार डॉ. अशोक नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली
मुलचेरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. २२ मार्च २०२५: मुलचेरा तालुका शहर व ग्रामीण भाजपाच्या सदस्यता नोंदणी आणि बुथ रचना आढावा बैठक डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, स्वामी विवेकानंद छात्रावास, मुलचेरा येथे संपन्न झाली.
या बैठकीस भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीत मा.खा. डॉ. अशोक नेते यांनी सदस्यता नोंदणी आणि बुथ रचना प्रक्रियेला गती देण्याचे महत्त्व स्पष्ट केले. भाजपाच्या संघटनात्मक बळकटीसाठी सर्व स्तरांवर प्रभावी कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त करत
विकासकामांवर विशेष भर देत
पुढे बोलताना मा.खा. डॉ. नेते यांनी म्हणाले रेल्वे, गोंडवाना विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, सिंचन योजना (कोटगल, चिचडोह बॅरेजेस),सुरजागड लोह प्रकल्प आणि रस्ते विकास यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकला. आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासात्मक कार्याची त्यांनी सविस्तर माहिती दिली.
मुलचेरा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सत्कार केल्याबद्दल व लोकसभा निवडणुकीतील सहकार्याबद्दल आभार मानले.
मा.खा. डॉ. अशोक नेते यांचा मुलचेरात सत्कार
मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित झाल्याबद्दल बैठकीदरम्यान मुलचेरा भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान केला.
बैठकीला उपस्थित मान्यवर:
या बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशजी दत्ता, तालुकाध्यक्ष संजयजी सरकार, जिल्हा सचिव बादलजी शहा,महामंत्री सुभाष गणपती, ता. महामंत्री निखिल हलदार, ता.उपाध्यक्ष अशोक बढाल तसेच मुलचेरा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

