बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चंद्रपूर जिल्हा युनिट च्या वतीने महाबोधी महाविहार बोधगया मुक्ती आंदोलनाचा तिसरा टप्पा

0
152

सुविद्या बांबोडे सहसंपादिका प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर आज दि. 22 मार्च 2025 शनिवार रोजी चंद्रपूर इथे जिल्हाधिकारी मुख्य कार्यालय समोर रैली, धरणे आंदोलन 11 ते 5 वाजे पर्यंत करण्यात आले होते. या धरणे आंदोलनात विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, की महाबोधी महाविहार बोधगया ही मूलनिवासी बहुजनांची बौध्द विरासत आहे, व विश्वाची धरोधर विरासत असुन, त्यावर परकिय विदेशी ब्राम्हणाचा कब्जा कसा? हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या त्याब्यात देण्यात यावे ,तसेच बुद्धगया टेंपल एक्ट 1949 रद्द करावा. या संदर्भात अनेक मान्यवरांनी आपले सविस्तर मार्गदर्शन केले, बहुसंख्ये च्या उपस्थित आंदोलन यशस्वी झाले. सदर प्रसंगी बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद,राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, भारत मुक्ति मोर्चा,राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ चे पदाधिकारी उपस्थीत होते, रैली नंतर अपर निवासी जिल्हाधिकारी मा डी एस कुंभार साहेब यानी निवेदन स्विकारले. आजच्या रैली च्या आयोजनात
मा. आनंदा गावंडे, मा. शंकरराव देवगडे,मा. विशाल भसारकर मा. कवडुजी पडवेकर,प्रा सूचिता खोब्रागडे मा.डाॅ.ज्योत्सना भागवत, मा.प्रा.कविता चंदनखेडे
मा. प्रतिभा जुलमे,मा. रंजना पाझारे, सुशीला तेलमोरे,सूरेखा लभाने, भारती खोब्रागडे, नंदागवळी, मंगला फुलझले, ज्योति वारके,सुषमा खोब्रागडे, पुणेकर यानी सहभाग घेऊन योगदान दिले तसेच अन्य मुलनिवासी बहुजन समाजातील उपासक,कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here